संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
![](https://static.wixstatic.com/media/9358fe_ea15a8d557f24a4cbbf4620bbdcb049b~mv2.jpeg/v1/fill/w_980,h_980,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/9358fe_ea15a8d557f24a4cbbf4620bbdcb049b~mv2.jpeg)
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
महागणपतिबुद्धिप्रियः क्षिप्रप्रसादनः ।
रूद्रप्रियो गणाध्यक्षः उमापुत्रोऽघनाशनः ।।
महागणपती - शरीरान्तर्गत अवयव म्हणजेच गण. त्या गणांवर सत्ता चालते तो जीवात्मा गणपती. अशा अगणित जीवांवर ज्याची सत्ता चालते ते परब्रह्म महागणपती होय.
बुद्धिप्रिय - १) बुद्धि अर्थात मोक्षप्रदायिका विद्या, मोक्षबुद्धी ती ज्यांना प्रिय ते बुद्धिप्रिय. २) भगवती बुद्धीचे जे प्रिय ते बुद्धिप्रिय.
क्षिप्रप्रसादन - क्षिप्र अर्थात शीघ्र. त्वरित प्रसन्न होणारे ते क्षिप्रप्रसादन.
रूद्रप्रिय - एकादश रूद्रांना, श्रीशंकरांना परमप्रिय असणारे. त्यांचे ही ध्याननिष्ठ उपास्य असणारे ते रूद्रप्रिय.
गणाध्यक्ष - विविध 'गणांचा' अध्यक्ष, प्रधान, संचालक.
उमापुत्र - अवताररूपात भगवती पार्वतीचे पुत्र झालेले. गिरिजा अशा पार्वतीचे आत्मतत्वच तिच्यासमोर प्रगटले याचसाठी ते गिरिजात्मज रूपात ओळखले जातात.
अघनाशन - १) अघ अर्थात पाय, मल, अशुद्धी, विकृती या सगळ्याचा नाश करणारे ते अघनाशन. २) घन म्हणजे प्रचंड. अघन म्हणजे अल्पस्वल्प. अशन म्हणजे भक्षण करणारे. अन्न अर्थात भक्तांद्वारे दिलेल्या अत्यल्प बाबींनीही तृप्त होणारे ते अघनाशन.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
18 नोव्हेंबर 2024, सोमवार - मुंबई चंद्रोदय २०:१६
अकोला - १९:५४ | जबलपूर - १९:३५ | पुणे - २०:१३ | रांजणगांव - २०:११ |
अमरावती - १९:५० | जळगांव - १९:५९ | पुळे - २०:१९ | लातूर - २०:०२ |
अलिबाग - २०:१७ | जालना - २०:०१ | बीड - २०:०४ | वडोदरा - २०:०५ |
अहमदनगर - २०:०८ | ठाणे - २०:१४ | बीदर - १९:५९ | वर्धा - १९:४७ |
अहमदाबाद - २०:०६ | धारवाड - २०:१६ | बुलढाणा - १९:५८ | विजयपूर - २०:०९ |
इंदूर - १९:५३ | धाराशिव - २०:०५ | बेंगळूरु - २०:११ | वेंगुर्ले - २०:२१ |
ओझर - २०:०७ | धुळे - २०:०३ | बेळगांवी - २०:१७ | छ.संभाजीनगर - २०:०३ |
कलबुर्गि - २०:०४ | नांदेड - १९:५६ | भंडारा - १९:४२ | सांगली - २०:१४ |
कल्याण - २०:१४ | नागपूर - १९:४४ | भुसावळ - १९:५८ | सातारा - २०:१४ |
कारवार - २०:२१ | नाशिक - २०:०९ | भोपाळ - १९:४५ | सावंतवाडी - २०:२० |
कोल्हापूर - २०:१६ | पंढरपूर - २०:०९ | महड - २०:१५ | सिद्धटेक - २०:०९ |
गदग - २०:१३ | पणजी - २०:२१ | मोरगाव - २०:११ | सोलापूर - २०:०७ |
गोकर्ण - २०:२१ | परभणी - १९:५९ | यवतमाळ - १९:५० | हुब्बळ्ळी - २०:१६ |
ग्वाल्हेर - १९:३४ | पाली - २०:१६ | रत्नागिरी - २०:१९ | हैदराबाद - १९:५७ |
コメント