संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_35ad63aae88142c68891bc754ce8dbd9~mv2.jpg/v1/fill/w_980,h_648,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/f0da78_35ad63aae88142c68891bc754ce8dbd9~mv2.jpg)
अविघ्नस्तुंबरूः सिंहवाहनो मोहिनीप्रियः । कटंकटो राजपुत्रः शालकः सम्मितोऽमितः ॥
अविघ्न - १) विघ्नरहित, विघ्नविनाशक हा सामान्य अर्थ. २) अवि शब्दाचा अर्थ आहे पशु. पशुचा, पशुत्वाचा नाश करतो तो अवि-घ्न.
तुंबरू - तुंबरू अथति तंबोरा, तानपुरा. ज्याच्या आधाराशिवाय संगीतकार वा गायक तान छेडूच शकत नाही तसे ज्यांच्या आधारावर हे जीवनसंगीत सुरत होते ते गणराज तुंबरू ठरतात.
सिंहवाहन - भगवान श्रीगणेशांनी विविध युगात विविध अवतार घेतले. त्याच्या कृतयुगात झालेल्या कश्यपगृहीच्या श्रीविनायक अवताराचा येथे संबंध आहे. त्या अवतारात भगवान सिंहावर आरूढ होते. २) सिंह अर्थात पशुंचा राजा. जीवांचा नायक, त्या सकल नायकावर आरूढ ते सिंहवाहन.
मोहिनीप्रिय - मायाशक्ती 'आवरण' आणि 'विक्षेप' अशा दोन रूपात कार्य करते. यालाच गाणेश साम्प्रदायात सिद्धि तथा बुद्धी असे म्हणतात. देवी सिद्धी या जगताला मोहित करते अतः तिला मोहिनी म्हणतात. त्या सिद्धीचे नाथ मोहिनी प्रिय म्हटले जातात.
कटंकट - कट शब्दाचा अर्थ आहे आवरण. आवरण असते अज्ञानाचे. त्या अज्ञानावर आवरण घालणारा अर्थात अज्ञान नाश करणारा. ज्ञानदाता भगवान कटंकट ठरतो.
राजपुत्र - द्वापार युगात भगवान श्रीगजानन अवतारात ते राजा' वरेण्याच्या घरी पुत्ररूपात आले होते. त्याअर्थी राजपुत्र.
शालक - श शब्दाचा अर्थ आहे परोक्ष, इंद्रियातीत. तर अलक म्हणजे केस, केस हा शरीराचा अंतिमभाग आहे. ज्यांचा अंत, परिसीमा अज्ञात आहे, ज्यांना पूर्णतः जाणणे इंद्रियांना अशक्यप्राय आहे असे मनोवाणीअतीत तत्व आहे शालक.
सम्मित - मित अर्थात मोजणे. मोजण्याचा लक्ष्यार्थ व्यापणे असे आहे. त्याला सम् अर्थात संपूर्ण सुयोग्य हा उपसर्ग लागला. जे परमतत्व अनंतकोटी ब्रह्मांडांना पूर्णतः व्यापूनही 'दशांगुले' उरलेलेच आहे त्यास सम्मित म्हणतात.
अमित - ज्यास कशानेही मोजता येत नाही. जे मर्यादित होऊ शकत नाही. ज्याला कशानेही व्यापता, झाकता येत नाही त्या अमर्याद परमात्म्यास अमित म्हणतात.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
17 जानेवारी 2025, शुक्रवार - मुंबई चंद्रोदय २१:३२
अकोला २१:१३ | जबलपूर २०:५९ | पुणे २१:२८ | रांजणगांव २१:२६ |
अमरावती २१:१० | जळगांव २१:१९ | पुळे २१:३१ | लातूर २१:१६ |
अलिबाग २१:३२ | जालना २१:१८ | बीड २१:१९ | वडोदरा २१:२८ |
अहमदनगर २१:२३ | ठाणे २१:३१ | बीदर २१:१३ | वर्धा २१:०६ |
अहमदाबाद २१:२९ | धारवाड २१:२५ | बुलढाणा २१:१७ | विजयपूर २१:२१ |
इंदूर २१:१६ | धाराशिव २१:१९ | बेंगळूरु २१:१६ | वेंगुर्ले २१:३० |
ओझर २१:२६ | धुळे २१:२२ | बेळगांवी २१:२७ | छ.संभाजीनगर २१:२१ |
कलबुर्गि २१:१६ | नांदेड २१:१२ | भंडारा २१:०२ | सांगली २१:२६ |
कल्याण २१:३० | नागपूर २१:०४ | भुसावळ २१:१८ | सातारा २१:२८ |
कारवार २१:२९ | नाशिक २१:२७ | भोपाळ २१:१० | सावंतवाडी २१:३० |
कोल्हापूर २१:२७ | पंढरपूर २१:२२ | महड २१:३० | सिद्धटेक २१:२४ |
गदग २१:२२ | पणजी २१:३० | मोरगाव २१:२६ | सोलापूर २१:२० |
गोकर्ण २१:२८ | परभणी २१:१५ | यवतमाळ २१:०९ | हुब्बळ्ळी २१:२४ |
ग्वाल्हेर २१:०४ | पाली २१:३० | रत्नागिरी २१:३१ | हैदराबाद २१:०९ |
Comments