top of page

संकष्ट चतुर्थी, 18 डिसेंबर 2024

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.

संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...


कुमारगुरूरीशान पुत्रो मूषकवाहनः । सिद्धिप्रियः सिद्धिपतिः सिद्धः सिद्धिविनायकः ।।


कुमारगुरू - १) कुमार अर्थात कार्तिकेय, स्कंद, त्यांचे जेष्ठ भ्राता ते कुमारगुरू, २) कुमार अर्थात सनक - सनंदन - सनातन सनत्‌कुमार नामक अतिदिव्य ब्रह्मर्षी. त्यांना आत्मविद्याप्रदान करणारे श्रीगणनाथ कुमारगुरू ठरतात.


ईशानपुत्र - ईशान हे भगवान श्रीशंकरांचे नाम आहे. त्यांचे पुत्र ते ईशानपुत्र. १) अवताररूपात श्रीशंकरांच्या घरी तब्बल अठ्‌ठ्यांशी हजार अवतार झाल्याचे गाणपत्य सांप्रदायात वर्णित आहे. त्या अर्थाने ईशानपुत्र. २) 'आत्मा वै पुत्र नामासि।' अर्थात आत्माच पुत्र रूपात प्रगटतो या अर्थाने श्रीशिवांचे आत्मचैतन्य ते ईशानपुत्र. ३) ज्यांना प्रथम ज्ञान होते त्यांना जनक म्हणतात. उदा. गुरूत्वाकर्षणाचा जनक न्यूटन. तसे ज्या गणराजांचे ज्ञान सर्व प्रथम श्रीशंकरांना झाले ते गणेश जनक आणि मग त्या सापेक्ष रीतीने श्रीगणेशांना ईशानपुत्र म्हणतात.


मूषक वाहन - १) शास्त्रानुसार मूषक हे काळाचे प्रतीक आहे. जसा उंदीर आपण बेसावध असतांना रात्री आपले कार्य करतो. जसा आतून वस्तूंना पोखरतो, जसा यच्चयावत् सगळ्याच बाबींना कुरतडतो, कमी करतो तसा काळ देखील सर्वभक्षक आहे. त्या काळावर ज्याची सत्ता चालते त्या कालत्रयातीत परब्रह्मास मूषकवाहन म्हणतात. २) शरीराच्या आत राहून समस्त भोगांना भोगणाऱ्या जीवात्म्यास शास्त्र मूषक म्हणते. त्या जीवात्म्यावर ज्यांचा अधिकार चालतो त्या परमात्म्यास मूषक वाहन म्हणतात.


सिद्धिप्रिय - अणिमा आदि अष्टमहासिद्धींचे वर्णन शास्त्रकार करतात. त्या सिद्धि ज्यांना प्रिय असतात. अर्थात ज्यांच्या जवळच असतात ते सिद्धिप्रिय.


सिद्धिपती - शास्त्रकारांनी सिद्धींचे अतिसूक्ष्म विवेचन करीत चौसष्ट कोटी अर्थात चौसष्ट प्रकारच्या सिद्धि म्हणजे कलांचे वर्णन केले आहे. त्या सगळ्या विद्या-कला ज्यांच्या अधिपत्याखाली असतात. त्या परमेश्वरास सिद्धिपती म्हणतात.


सिद्ध - स्वतः सिद्ध. अर्थात ज्यांच्या ज्ञानासाठी अन्य कशाची आवश्यकता नसते. ज्यांना कोणत्या उपायाने सिद्ध करून दाखवावे लागत नाही. ते स्वसंवेद्य परब्रह्म 'सिद्ध' होय.


सिद्धिविनायक - सिद्धि अर्थात प्राप्त करण्याची बाब. चतुर्विध पुरूषार्थ. त्यांच्या प्रत भक्तांना जे नेतात. विशेषत्वाने जे भक्तांना धर्मार्थकाममोक्षप्रदान करतात ते 'सिद्धि-वि-नायक'


(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)

 

काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे

18 डिसेंबर 2024, बुधवार - मुंबई चंद्रोदय २१:०२

अकोला २०:४२

जबलपूर २०:२५

पुणे २०:५९

रांजणगांव २०:५७

अमरावती २०:३८

जळगांव २०:४७

पुळे २१:०४

लातूर २०:४८

अलिबाग २१:०३

जालना २०:४८

बीड २०:५०

वडोदरा २०:५४

अहमदनगर २०:५४

ठाणे २१:०१

बीदर २०:४५

वर्धा २०:३५

अहमदाबाद २०:५५

धारवाड २१:००

बुलढाणा २०:४६

विजयपूर २०:५५

इंदूर २०:४२

धाराशिव २०:५१

बेंगळूरु २०:५४

वेंगुर्ले २१:०५

ओझर २०:५४

धुळे २०:५०

बेळगांवी २१:०१

छ.संभाजीनगर २०:५०

कलबुर्गि २०:४९

नांदेड २०:४३

भंडारा २०:३०

सांगली २०:५९

कल्याण २१:०१

नागपूर २०:३२

भुसावळ २०:४६

सातारा २१:००

कारवार २१:०५

नाशिक २०:५७

भोपाळ २०:३५

सावंतवाडी २१:०४

कोल्हापूर २१:०१

पंढरपूर २०:५५

महड २१:०१

सिद्धटेक २०:५५

गदग २०:५८

पणजी २१:०५

मोरगाव २०:५७

सोलापूर २०:५२

गोकर्ण २१:०५

परभणी २०:४५

यवतमाळ २०:३८

हुब्बळ्ळी २१:००

ग्वाल्हेर २०:२५

पाली २१:०२

रत्नागिरी २१:०४

हैदराबाद २०:४२


Comments


Vist our 
Website

bottom of page