top of page

संकष्ट चतुर्थी

वैशाख कृष्ण चतुर्थी, 26 मे 2024




संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...


सुमुख - मुख शब्दाचा अर्थ आहे प्रारंभ. अर्थात ज्यांच्या नामोच्चारणाने सर्व कार्यारंभ शुभ होतात. ते गणनाथ सुमुख होत.


दुर्मुख - मुख शब्दाचा अन्य अर्थ आहे ओळख. ज्यांची ओळख अर्थात ज्यांना जाणणे, समजून घेणे अतीव कष्टप्रद अर्थात् गहन आहे. गूढ आहे त्या अगम्यतत्वास दुर्मुख म्हणतात.


बुद्ध - नित्यज्ञानरूप. अविद्यानाशक या अर्थी.


विघ्नराज - अधिभौतिक, अधिदैविक व आध्यात्मिक अशा त्रिविध विघ्नांवर ज्यांची सत्ता चालते ते विघ्नराज.


गजानन - भगवान श्रीगणेशांचे एक अलौकिक नाम. चार वेदांचे अंतिम वर्ण मिळून निर्मित नाम आहे गजानन, ऋग् चा 'ग्' यजुः चा 'ज', सामन् चा 'न्' आणि अथर्वन् चा 'न' एकत्र येऊन नाम झालें गजानन. अर्थात चारही वेदांचे अंतिम कथनीय ते परब्रह्म आहे गजानन, गजवक्त्र चा अर्थ तर आहेच.

(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)


 

काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे

26 मे 2024, रविवार - संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय २२:०२


अकोला २१:४९

जबलपूर २१:४३

पुणे २१:५६

रांजणगांव २१:५५

अमरावती २१:४६

जळगांव २१:५५

पुळे २१:५६

लातूर २१:४५

अलिबाग २२:०१

जालना २१:५१

बीड २१:५०

वडोदरा २२:०९

अहमदनगर २१:५४

ठाणे २२:०२

बीदर २१:४०

वर्धा २१:४२

अहमदाबाद २२:१३

धारवाड २१:४४

बुलढाणा २१:५२

विजयपूर २१:४५

इंदूर २१:५८

धाराशिव २१:४६

बेंगळूरु २१:२७

वेंगुर्ले २१:५१

ओझर २२:०२

धुळे २१:५९

बेळगांवी २१:४७

छ.संभाजीनगर २१:५४

कलबुर्गि २१:४१

नांदेड २१:४३

भंडारा २१:३९

सांगली २१:४९

कल्याण २२:०१

नागपूर २१:४१

भुसावळ २१:५५

सातारा २१:५४

कारवार २१:४६

नाशिक २२:००

भोपाळ २१:५४

सावंतवाडी २१:५०

कोल्हापूर २१:५०

पंढरपूर २१:४८

महड २१:५९

सिद्धटेक २१:५३

गदग २१:४१

पणजी २१:४९

मोरगाव २१:५४

सोलापूर २१:४६

गोकर्ण २१:४५

परभणी २१:४६

यवतमाळ २१:४३

हुब्बळ्ळी २१:४३

ग्वाल्हेर २१:५९

पाली २१:५९

रत्नागिरी २१:५५

हैदराबाद २१:३४


Comentarios


Vist our 
Website

bottom of page