संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारक चतुर्थी म्हणतात. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी हा योग अत्यन्त शुभ आणि कार्यसिद्धी देणारा मानला जातो.
![](https://static.wixstatic.com/media/f0da78_a982c21b6144491ab5dda901805f0437~mv2.jpg/v1/fill/w_980,h_980,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,enc_avif,quality_auto/f0da78_a982c21b6144491ab5dda901805f0437~mv2.jpg)
गणेश चतुर्थी सोबत अंगारक हे नाव असणे मंगळाचे सानिध्य दर्शविते. पौराणिक कथेनुसार पृथ्वीचा पुत्र मंगळाने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी खूप कठोर तप केले. मंगळाची तपस्या आणि त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्याना दर्शन दिले आणि आपल्या बरोबर राहण्याचा आशीर्वाद दिला. मंगळाचे तेज आणि रक्तवर्ण (लाल रंग) यामुळे मंगळास अंगारक हे नाव मिळाले आहे. यामुळे या चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणतात.
अंगारक चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
भीम - भयानक. अर्थात दुष्टांसाठी कष्टप्रद.
प्रमोद - आवश्यक, इच्छित बाबींच्या प्राप्तीने होणारा आनंद प्रमोद असतो. तो ज्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर लाभतो त्यांस प्रमोद म्हणतात.
आमोद - इच्छित वस्तूच्या प्राप्तीसाठी निश्चय झाल्याने प्राप्त आनंदाला आमोद म्हणतात. अर्थात् संकल्पविकल्प संपतात. त्या निर्विकल्प दशेला आमोद म्हणतात. हा निश्चय बुद्धीचा विषय आहे आणि तो मिळतो, बुद्धिपतिद्वारे म्हणून श्रीगणेशास आमोद म्हणतात.
सुरानंद - सुर अर्थात देवता. देवतांना आनंदप्रदान करणारे ते सुरानंद. सुर चा अर्थ संगीतातील तान असा पण होतो. त्या सुरांचा आनंद खरा रसिक डोळे मिटून घेतो. अन्तर्मुख होतो. या अन्तर्मुखत्वाने लाभणारा आनंद सुरानंद. तो अंतरीचा आनंद श्रीगणनाथांचाच होय.
मदोत्कट - एक अर्थ असा, श्रीगणनाथांच्या गजमस्तकातून ब्रह्मरसामृत पाझरत असते. त्याद्वारे जसा हत्ती मदमस्त होतो तसे जे आत्मसुखातच रममाण असतात ते मदोत्कट किंवा दुसरा अर्थ, सगळ्यांचा मद ज्या चरणी उत्कट होतो अर्थात गळून जातो ते मदोत्कट.
हेरंब - 'हे' शब्दाचा अर्थ जगत् असा असून 'रम्ब' शब्दाचा अर्थ संचालक आहे. अर्थात हेरंब म्हणजे जगत्संचालक.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या अंगारक चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
25 जून 2024, मंगळवार - अंगारक चतुर्थी मुंबई चंद्रोदय २२:२८
अकोला २२:१३ | जबलपूर २२:०५ | पुणे २२:२३ | रांजणगांव २२:२१ |
अमरावती २२:१० | जळगांव २२:१९ | पुळे २२:२३ | लातूर २२:११ |
अलिबाग २२:२७ | जालना २२:१६ | बीड २२:१६ | वडोदरा २२:३१ |
अहमदनगर २२:२० | ठाणे २२:२८ | बीदर २२:०७ | वर्धा २२:०७ |
अहमदाबाद २२:३५ | धारवाड २२:१४ | बुलढाणा २२:१६ | विजयपूर २२:१३ |
इंदूर २२:२१ | धाराशिव २२:१३ | बेंगळूरु २१:५९ | वेंगुर्ले २२:२० |
ओझर २२:२६ | धुळे २२:२३ | बेळगांवी २२:१६ | छ.संभाजीनगर २२:१९ |
कलबुर्गि २२:०९ | नांदेड २२:०९ | भंडारा २२:०३ | सांगली २२:१८ |
कल्याण २२:२७ | नागपूर २२:०५ | भुसावळ २२:१९ | सातारा २२:२१ |
कारवार २२:१६ | नाशिक २२:२५ | भोपाळ २२:१५ | सावंतवाडी २२:१९ |
कोल्हापूर २२:१९ | पंढरपूर २२:१५ | महड २२:२६ | सिद्धटेक २२:१९ |
गदग २२:११ | पणजी २२:१८ | मोरगाव २२:२० | सोलापूर २२:१३ |
गोकर्ण २२:१५ | परभणी २२:१२ | यवतमाळ २२:०८ | हुब्बळ्ळी २२:१३ |
ग्वाल्हेर २२:१७ | पाली २२:२५ | रत्नागिरी २२:२३ | हैदराबाद २२:०२ |
Comments